छान किती दिसते...
फुलपाखरू?
हा कुठे प्रश्न होवू शकतो? निःसंशय नाही होवू शकत!
सृष्टीच्या अद्भुत सौंदर्यातील मुकुटमणी म्हणजे ही चंचल, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरे!
फुलपाखरे नाव उच्चारताच आपले मन बालपणात डोकावू लागते. किती तरी वेळा आपण त्यांचा पाठलाग केलेला असेल. त्यांना हातात पकडलेले असेल. त्याचा स्पर्श अजूनही जाणवत असेल नाही! त्यांचे ते विविध रंग. त्यांचे ते हवेत भिरभिरणे. गिरक्या घेणे. सारे कसे मनमोहक असते. रानवाटेवर रानफुलांच्या सहवासात उच्छृंखलपणे बागडणारी फुलपाखरे पाहणे यासारखी रमणीय गोष्ट दुसरी नाही! या फुलांवरून त्या फुलांवर बसून फुलांतील गोड मकरस चाखणारी फुलपाखरे पाहून आपण त्यांच्या सौंदर्याने मुग्ध होवून जातो. म्हणूनच अशा फुलपाखरांना कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह प्रत्येकास होत असतो!
परंतु या चंचलतेला कॅमेऱ्यात बंदिस्त करणे खूपच अवघड असते. काही थोडेच क्षण मिळतात आपल्याला त्यांना टिपायला. या थोड्या क्षणात आपल्या मनासारखा क्लिक यायला खूपच परिश्रम घ्यावे लागते. ती एक एकाग्रतेने करायची साधनाच असते. या साधनेचे मनासारखे फळ मिळायला खूप वेळ लागतो. परंतु या चंचलतेला टिपण्याची योग्य वेळ असते सायंकाळची! दिवसभर हुलकावणी देणारी ही फुलपाखरे सायंकाळी निवांतपणे गवताच्या पात्यांवर, झुडुपांच्या पानावर विसावतात. ही संधी साधून आपण त्यांचे हे सौंदर्य टिपू शकतो. नशिबाने साथ दिली तर एक अलौकिक दृश्य आपण टिपू शकतो! चला तर मग रानवाटांवर!
आज मी येथे #Joker या फुलपाखराची काही छायाचित्रे व मोबाईलद्वारे घेतलेला एक अफलातून video शेअर करत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल.
Joker या फुलपाखराचे शास्त्रीय नाव
Byblia ilithyia Drury आहे.
निम्फालीडी या कुळातील हे फुलपाखरू आहे.
(सदर video माझ्या On the road या youtube channel वर उपलब्ध आहे.)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा