प्रवरेच्या उगमस्थानी
Lockdown च्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 15 जानेवारी रोजी मित्रांबरोबर घरातून बाहेर पडलो. कुठे जायचे? अंजनेरी, मुल्हेर, रतनगड? शेवटच्याक्षणी रतनगडावर शिक्कामोर्तब झाले आणि निघालो. १२० कि.मी. चा प्रवास! ३ मोटारसायकल, ६ स्वार! सूर्योदयापूर्वी प्रवास सुरु झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे धरतीवरील स्वर्गच जणू! निसर्गसौंदर्याचा असा काही वरदहस्त येथील भूमीस लाभला आहे की, स्तिमित व्हायला होते. एकदा तुम्ही या भूमीवर पाय ठेवला की पुन्हा घरी जाऊच नये असे वाटते. पावसाळ्यात तर या स्वर्गीय भूमीचे सौंदर्य कल्पनातीत असते. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर धो-धो कोसळणारा पाऊस, ते खळखळून वाहणारे झरे, बेलगाम कोसळणारे धबधबे सारं काही मंत्रमुग्ध करणारं! गिरिप्रेमींना नेहमीच खुणावणारे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथेच आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड आणि विश्रामगडासारखे इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे किल्ले या भूमीत आहेत. अमृतेश्वर-हरिश्चंद्रेश्वरासारखी प्राचीन शिवलये या भूमीत आहेत. अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले प्रवरा (अमृतवाहिणी) नदीवरील भंडारदरा धरण येथेच आहे. अशा या निसर्गसंपन्न अकोले तालुक्यातील रतनगड हा एक किल्ला आहे.
![]() |
| दुरूनच खुणावणारा किल्ले रतनगड |
दाट झाडीतून चालताना मध्येच पाऊस, वादळाने उन्मळून पडलेले मोठे वृक्ष वाट अडवितात.
![]() |
| वाट अडविणारी कोसळलेली झाडे..! |
![]() |
| गुहेच्या 'डोळ्यातून' दिसणारा रतनवाडीचा परिसर |
येथून आजूबाजूस पाहिल्यावर बराच मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या वास्तुस भेट देवून उजव्या बाजूने उंच वाढलेल्या गवतातून जाणारी पायवाट 'नेढ्याकडे' घेवून जाते. 'नेढे' म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्यासाठी असणारे छिद्र ! ही एक नैसर्गिक रचना आहे. यातून पलीकडे जाता येते. तत्पूर्वी पश्चिमेला असलेले त्र्यंबक व कल्याण दरवाजे पाहून घ्यावे. हे दरवाजे म्हणजे किल्ल्याची प्रमुख प्रवेशद्वारे आहेत. ही प्रवेशद्वारे व कातळात कोरलेली वाट पाहून या किल्ल्याच्या भक्कमतेची साक्ष पटते. पूर्वीची सुरक्षा यंत्रणा पाहता शत्रूस या वाटेने किल्ल्यात प्रवेश करणे अशक्य होते. हे प्रवेशद्वार व मार्ग म्हणजे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होय.
या दरवाजांना भेट देवून नेढ्याकडे वाटचाल करण्यापूर्वी एक वैशिष्टयपूर्ण डोंगर; ज्याला 'खुटा' म्हणतात (जो आपले प्रथम पासूनच लक्ष वेधून घेत असतो) त्याची छायाचित्रे घेण्याचा मोह होतोच.
![]() |
| नेढे |
अमृतेश्वर मंदिर-
![]() |
| पुष्करिणी |
मंदिरावरील कोरीवकाम खूपच सुंदर आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे बाहेरील बाजू झिजलेली असली तरी नक्षीकामाच्या सुंदरतेची कल्पना येते. आतील सभामंडप अजूनही बराचसा सुस्थितीत आहे. देवादिक, यक्ष-गंधर्व, नृत्यांगनांची सुंदर शिल्पे खांबांवर व भिंतींवर कोरलेली आहे. काही कामशिल्पेही आहेत. गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्यात असते. सूर्यास्तावेळी या मंदिराचे सौंदर्य पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो!
किल्ल्यावरील प्रवेशद्वारे
![]() |
| मुख्य प्रवेशद्वार |
![]() |
| गणेश दरवाजा |
![]() |
| हनुमान दरवाजा |












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा