पेटारी (Indian Mallow)
Botanical name: Abutilon Indicum
Family: Malvaceae
आपल्या पिवळ्याधमक फुलांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या फळांनी लक्ष वेधून घेणारी ही वनस्पती मुद्रिका, कांगोरी या नावानेही ओळखली जाते. फळांचा आकार बंद पेटीसारखा असतो म्हणून कदाचित या वनस्पतीस पेटारी हे नाव मिळाले असावे. ही पेटी उघडली की आतील बियांचा खजिना दृष्टीस पडतो.
या पेटीमध्ये दडलंय काय?
जवळजवळ वर्षभर फुलणारी ही वनस्पती शिशिर आणि वसंत ऋतूत अधिकच बहरते. पेटारी नावाचा एक मोठा वृक्षही असतो. पण आपण आता ज्या वनस्पतीबद्दल बोलतोय ती छोटेखानी एक ते दोन मीटर उंच वाढते. पाने साधी हृदयाकार असतात. पानांच्या कडा दातेरी असतात. पडीक जागेत, शेतात, बांधावर उगवलेली दिसते. या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग आहेत.
सध्या या वनस्पतीच्या फुलांचा बहर जोमात आहे. तेव्हा बाहेर पडा आणि चला रानवाटेवर पेटारीचे सौंदर्य पाहायला!
![]() |
| या पेटीमध्ये दडलंय काय? |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा